घराची भिंत कोसळून आठजण जखमी

घराची भिंत कोसळून आठजण जखमी

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः भटवाडी येथे निर्माणाधिन घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन महिलांसह पाच पुरुष असे एकूण आठजण जखमी झाले आहेत. मिळालेल्‍या माहितीनुसार घाटकोपर पश्चिम येथील हनुमान मंदिराजवळ तळमजला अधिक एक मजली घराचे बांधकाम सुरू असताना शनिवारी (ता. ४) सायंकाळी घराची भिंत अचानक कोसळली. या घटनेत आठजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. जखमींना नजीकच्या न्यू लाईफ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या जखमींवर उपचार करून त्यांना बरे वाटू लागल्याने घरी पाठवले. सदर दुर्घटनेबाबत स्थानिक पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com