
सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख यांनी आपला ५९ वा वाढदिवस शारदा फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा केला. आरोग्य शिबिर, दृष्टिहीन नागरिकांना प्रेशर कुकर व अपंग अनाथ पशुंसाठी खाद्यवाटप असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राजीव झा, राज्य नेते महेश तपासे व अन्य वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वांगणी येथील जवळपास चार हजार पाचशे भटक्या प्राण्यांवर उपचार करणारे व पाणवठा या अपंग प्राण्यांच्या अनाथ आश्रमात शेकडो प्राण्यांचे संगोपन करणाऱ्या गणराज व अर्चना जैन या दाम्पत्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी कालिदास देशमुख यांनी पशूंना खाद्यवाटप केले. शेकडो दृष्टिहीन नागरिकांना त्यांनी घरगुती वापरात सुविधा मिळावी यासाठी प्रेशर कुकरचेही वाटप केले. हा कार्यक्रम वांगणी ग्रामपंचायत कार्यालय हद्दीत पार पडला. या वेळी बदलापुरातील सुप्रसिद्ध प्रगती अंध विद्यालयातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी सुंदर गीते सादर केली.