Sat, June 10, 2023

वाड्यात भरला आनंद बाजार
वाड्यात भरला आनंद बाजार
Published on : 7 March 2023, 10:37 am
वाडा, ता. ७ (बातमीदार) : वाडा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. व्यापार करताना विद्यार्थ्यांना बघून पालकही भारावून गेले होते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीच्या माध्यमातून हिशोब व व्यवहार ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने हा आनंद बाजार भरवण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले. या बाजारात विद्यार्थ्यांनी घरी बनवलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. मुलांमध्ये विक्री कौशल्य किंवा धाडसीपणा येण्यासाठी हे उपक्रम प्राथमिक शाळेत राबवणे गरजेचे असल्याचे वाडा नगर पंचायतीचे नियोजन समितीचे सभापती रामचंद्र जाधव यांनी सांगितले.