Mon, March 27, 2023

बाईक रॅलीतून महिला सक्षमीकरणाचा संदेश
बाईक रॅलीतून महिला सक्षमीकरणाचा संदेश
Published on : 7 March 2023, 10:38 am
मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः महिला दिनानिमित्त ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली मयुरा बाणावली यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीमधून महिला सक्षमीकरणाचे महत्त्व, महिलांचे शिक्षण, महिलांचे आरोग्य आणि स्वातंत्र्य याबद्दल संदेश दिले गेले. एकूण १२५ महिलांनी या बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. ही रॅली सकाळी ८ वाजता मुलुंड पूर्वेतील केळकर कॉलेज येथून सुरू होऊन संभाजी मैदान येथे समारोप झाली. रॅलीचा त्रास सर्वसामान्यांना होऊ नये याची पुरेपूर काळजी मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली होती.