
पेंशनर असोशिएशनच्या राज्य अध्यक्षपदी चंद्रकांत शेळके यांची निवड
मुरबाड, ता. ७ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील सेवानिवृत्त वनाधिकारी चंद्रकांत शेळके यांची वन सेवानिवृत्त पेंशनर असोशिएशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा मुरबाड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. वनविभागाच्या कै. अविनाश बोंबे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सत्कार समारंभास संघटनेचे राज्यभरातून निवृत्त वन कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त वनाधिकारी रावसाहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून एम. व्ही. पाटील, पिल्लारी शेठ, सुनील भोंडिवले, अर्जुन निचिते, सुधीर फडके, अंकुश तारमळे, डी. के. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र साबळे, कपिल पवार, संदीप केदार, दिगंबर शिंगोळे, दिनेश चौधरी, अल्पना घोलप यांनी केले होते.