वाडा शहरातील रस्ते झालेत चकाचक

वाडा शहरातील रस्ते झालेत चकाचक

वाडा, ता. ७ (बातमीदार) : गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे करून महत्त्‍वाची समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत.
वाडा ग्रामपंचायतीचे गेल्या पाच वर्षांपूर्वी नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले. त्या वेळी रस्त्यांची समस्या बिकट होती. संपूर्ण शहरातील रस्ते खड्ड्यात गेले होते. ग्रामपंचायतीला पुरेसा निधी मिळत नसल्याने ही समस्या बिकट होती. मात्र, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने भरघोस निधी मिळून रस्त्यांची समस्या काही प्रमाणात मार्गी लागली आहे. खंडेश्वरी नाका ते परळी नाका हा मुख्य रस्त्यांसह वाडा पंचायत समिती ते शिवाजी नगर रस्ता, शिवाजीनगर ते गणेश नगर रस्ता, गुडलक यंग क्लब (आगर आळी) ते ऐनशेत रस्ता, वाडा पंचायत समिती ते सिध्दार्थ नगर रस्ता, सिध्दार्थ नगर ते वाडा नगरपंचायत रस्ता, श्रीराम मंदिरपासून गावदेवी मंदिर रस्ता, मुस्लिम मोहल्ला ते पाटील आळी रस्ता, मुख्य रस्ता ते शास्त्रीनगर रस्ता, मुख्य रस्ता ते सहयोग नगर रस्ता, विठ्ठल मंदिरापासून श्रीराम मंदिर रस्ता, स्वामी विवेकानंद शाळा ते अंजनीनगर रस्ता आदी अनेक रस्ते हे पाच वर्षांच्या कालावधीत तयार करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दहा कोटींहून अधिक खर्च करून वाडा शहरातील रस्ते बनविण्यात आले असून येथील रस्ते चकाचक झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com