ठाण्यात आगीच्या दोन घटनांत नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात आगीच्या दोन घटनांत नुकसान
ठाण्यात आगीच्या दोन घटनांत नुकसान

ठाण्यात आगीच्या दोन घटनांत नुकसान

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ (वार्ताहर) : ठाण्यात रविवारी (ता. ५) आगीच्या दोन घटना घडल्या. लुईसवाडीत इंटरनेट केबल सर्व्हरला सकाळी साडेआठ वाजता आग लागली; तर महागिरी कोळीवाडा परिसरात सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील वॉशिंग मशीनला आग लागली. दोन्ही घटनांमध्ये जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही. ठाणे पश्चिम येथील लुईसवाडी येथे मैत्री हाईट्स ही १० माळ्याची इमारत आहे. रविवारी सकाळी ८.३८ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या इंटरनेट सर्व्हर बॉक्स व इंटरनेट केबलला आग लागली होती. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आदींनी आगीवर नियंत्रण मिळवले. दुसरी घटना सकाळी ११.१४ वाजण्याच्या सुमारास कृष्णा अमृत सोसायटीत घडली. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर हिना रोहेर यांच्या घरातील वॉशिंग मशीनने अचानक पेट घेतला. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवले.