Wed, March 29, 2023

जीवनदीप महाविद्यालयात तंबाखूजन्य पदार्थांची होळी
जीवनदीप महाविद्यालयात तंबाखूजन्य पदार्थांची होळी
Published on : 7 March 2023, 11:02 am
खर्डी, ता. ७ (बातमीदार) : खर्डीतील जीवनदीप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने होळीनिमित्त महाविद्यालयात होलिकादहनाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून त्यांचा बचाव व्हावा, त्याचे आरोग्य उत्तम आणि निरोगी रहावे, यासाठी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे दहन या होळीत करण्यात आले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात, याबाबत कैलास कळकटे यांनी मार्गदर्शन केले. व्यसन केल्याने आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात, याबाबत गणेश बदले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अपर्णा जाधव व प्रा गणेश बदले यांनी केले.