Mon, June 5, 2023

खर्डीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
खर्डीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Published on : 7 March 2023, 11:18 am
खर्डी, ता. ७ (बातमीदार) : केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खर्डीतील मनसेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपतालुकाप्रमुख जयवंत बोडके, तालुका सहसचिव मच्छिंद्र गोजरे, मनविसे उपतालुकाध्यक्ष स्वप्नील पिचड, खर्डी विभाग अध्यक्ष अनिस शेख, दळखण शहर अध्यक्ष सन्नी दुनगेया, मनसेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सुरेश सामरे, सदा शिंदे, नाना जागले, कार्तिक भाकरे यांच्यासह विभागातील शिरोळ, बिरवाडी जिल्हा परिषद गटातील मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.