Thur, June 1, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे भूमिपूजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे भूमिपूजन
Published on : 7 March 2023, 11:23 am
कल्याण, ता. ७ (बातमीदार) : कल्याण पश्चिममधील भोईरवाडीमध्ये विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचन करण्यासाठी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या ५० लाखांच्या निधीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शहरप्रमुख रवी पाटील, अनिरुद्ध पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, उपशहरप्रमुख नरेंद्र कामत, उपशहर संघटक अंजली भोईर, उपविभागप्रमुख दीपक धनावडे, उपशाखा संघटक वंदना जळवी, शाखाप्रमुख संदीप जाधव, उपशाखाप्रमुख विजय उबाळे, युवासेनेचे योगेश पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला आघाडी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.