मुलुंडमध्ये विशेष कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये विशेष कार्यक्रम
मुलुंडमध्ये विशेष कार्यक्रम

मुलुंडमध्ये विशेष कार्यक्रम

sakal_logo
By

मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ यांच्या ‘मैत्रेयी’ या महिला विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रुळलेल्या वाटेवरची वेगळी वाट’ असे या विशेष कार्यक्रमाचे नाव असून हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १०) दुपारी ४.३० वाजता सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये पार पडणार आहे. या वेळी डॉ. श्वेता दुधाट यांच्याशी डॉ. श्वेता जोग संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.