गोवर रुग्णांत ७१ टक्क्यांची घट

गोवर रुग्णांत ७१ टक्क्यांची घट

मुंबई, ता. ८ : तीव्र गोवरच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या मुंबई शहरात ताप आणि पुरळ असलेल्या अनेक रुग्णांची नोंद होत आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत मुंबईत गोवरच्या आकडेवारीत ७१ टक्क्यांनी घट झाली आहे. जागरुकता, लसीकरण आणि घरोघरी तपासणीसारख्या पालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

कोविड महामारीनंतर मुंबईतील झोपडपट्ट्यांना गोवरच्या उद्रेकासारख्या आरोग्य आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागला. २४ पैकी २१ वॉर्डांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव नोंदवण्यात आला. ७ नोव्हेंबरनंतर परिस्थिती तीव्रपणे समोर आली. संशयित आणि निदान झालेल्या रुग्णांव्यतिरिक्त शहरात ऑक्टोबरच्या अखेरपासून डिसेंबर २०२२ पर्यंत ११ मुलांचा मृत्यू झाला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून टीम तैनात करण्यात आली होती. घरोघरी जाऊन तीव्र तपासणी आणि लसीकरणासारख्या अनेक उपायांची शिफारस केली गेली. पालिकेने आठ रुग्णालयांमध्ये ३३८ खाटांची व्यवस्था केली. नोव्हेंबर २०२२ पर्यंत शहरात गोवरचे निदान झालेल्या ३२३ रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबरअखेर मुंबईत ५७७ रुग्ण नोंदले गेले. ३३८ पैकी ९१ बेड मुलांनी व्यापले होते. आठ रुग्ण आयसीयूमध्ये होते, पण गेल्या दोन महिन्यांत रुग्ण दाखल होण्याची संख्या कमी झाली आहे. ४ मार्च रोजी केवळ २६ मुलांना दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी चार आयसीयूमध्ये आहेत आणि एक ऑक्सिजन सपोर्टवर आहे. उर्वरित सामान्य वॉर्डमध्ये आहेत.

पालिका आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांच्या तुलनेत रुग्ण दाखल होण्याची संख्या कमी झाली आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात १७ रुग्ण दाखल आहेत. येणाऱ्या रुग्णांना अजूनही ऑक्सिजनची गरज आहे. काही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आहे; पण ते बरे होत आहेत. चालू वर्षात शहरात गोवरचे १२९ रुग्ण नोंदले गेले. मागील वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत गोवरची ४५० हून अधिक प्रकरणे नोंदली गेली.

नोव्हेंबरपासून आम्ही सक्रिय रुग्ण शोधणे, सखोल निरीक्षण करणे, व्हिटॅमिन ‘ए’चे डोस देणे आणि नियमित लसीकरण सुरू ठेवले आहे. आम्ही अतिरिक्त लसीकरणही करत आहोत. अजून काहीच थांबवलेले नाही. परिणामी रुग्ण कमी झाले आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लसीकरण न झालेल्यांनी ते करून घेणे आवश्यक आहे.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com