ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा
ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
योगेश भोईर समतानगर प्रभाग २४ येथील माजी नगरसेवक आहेत. भोईर यांनी ८५ लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. योगेश भोईर यांच्यावर ज्ञात मिळकतीपेक्षा जास्त संपदा जमवल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये भोईर यांच्याविरोधात खंडणीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. प्रकरणातील सहआरोपी गणेश ठाकूर आणि दिनेश ठाकूर या दोन बंधूंकडून देवाराम दर्गाराम चौधरी यांनी तीन टक्के सावकारी व्याजाने २२ लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. २०१५ पर्यंत त्यांनी व्याजासहित २४ लाख ६५ हजार रुपये त्यांना परत केले होते; मात्र ही रक्कम देऊन ते दोघेही त्यांच्याकडे १० टक्के व्याजदाराने आणखी पैशांची मागणी करीत होते. याचदरम्यान त्यांना ठाकूर यांच्या वतीने योगेश भोईर यांनी साडेसात लाख रुपये परत करण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.