संत तुकाराम महाराज बीज उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकाराम महाराज बीज उत्सव
संत तुकाराम महाराज बीज उत्सव

संत तुकाराम महाराज बीज उत्सव

sakal_logo
By

पेण (बातमीदार) : तालुक्यातील तुकाराम वाडी येथे ३ ते १० मार्चपर्यंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव सुरू झाला आहे. बुधवारी (ता. ८) रात्री नऊ वाजता हभप श्याम महाराज वाळूज कर्जत यांचे कीर्तन होईल. गुरुवार (ता. ९) हभप श्याम महाराज यांचे पुष्पवृष्टीचे कीर्तन होणार आहे. तर शुक्रवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता बाळू महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती तुकारामवाडी ग्रामस्थांनी केली आहे.