विक्रमगडमध्ये राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा
विक्रमगडमध्ये राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा

विक्रमगडमध्ये राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) : वीज वितरण व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मार्च रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यात हा दिवस उत्साहात साजरा करून जनमित्र (लाईनमन) यांचा सन्मान करण्यात आला. विक्रमगड पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या समारंभास अभियंता महेश नागुल, कनिष्ठ अभियंता प्रशांत कराळे, तहसील कार्यालय विक्रमगडचे रवी बेलापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काही लाईनमन यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व लाईनमन यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी महावितरणचे मंगेश पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.