नायगाव पोलिस ठाणे उदघाटनाच्‍या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायगाव पोलिस ठाणे उदघाटनाच्‍या प्रतीक्षेत
नायगाव पोलिस ठाणे उदघाटनाच्‍या प्रतीक्षेत

नायगाव पोलिस ठाणे उदघाटनाच्‍या प्रतीक्षेत

sakal_logo
By

विरार, ता. ८ (बातमीदार) : पालघर ग्रामीणमधून वसई तालुका हा मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत आल्यानंतर या ठिकाणच्या पोलिस यंत्रणेला बळ मिळाले आहे. तालुक्यात नव्याने पोलिस ठाणी निर्माण होत आहेत. यातीलच एक म्हणजे नायगाव पोलिस ठाणे. हे ठाणे तयार होऊन उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच याच्या कॉर्पोरेट लूकमुळे ते उद्‌घाटनापूर्वीच चर्चेत आले आहे.
तालुक्यासाठी एकूण पाच पोलिस ठाणी मंजूर करण्यात आली आहेत. या पाचपैकी पेल्हार, मांडवी, आचोळे ही तीन पोलिस ठाणी मार्गस्थ झाली असून, चौथे पोलिस ठाणे अर्थात नायगाव पोलिस ठाणे लवकरच मार्गी लागत आहे. यातील नायगाव पोलिस ठाणे हे सध्या ‘कॉर्पोरेट’ टचमुळे उद्‌घाटनापूर्वीच प्रकाशझोतात आले आहे. प्रस्तावित नायगाव पोलिस ठाण्याचे नवे व पहिले पोलिस निरीक्षक रमेश भामे व सहायक पोलिस निरीक्षक बळराम पालकर यांच्या अथक परिश्रमातून हा लूक पोलिस ठाण्याला मिळण्यास मदत झाली आहे. या ठाण्यात अधिकारी कक्ष, अंमलदार कक्ष तसेच इतर कक्षांचेही काम पूर्ण झाले आहे. वालीव पोलिस ठाण्याचे विभाजन करून हे पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीचा मोठा परिसर तसेच वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नवीन नायगाव पोलिस ठाणे हे नायगाव पूर्व विभागासाठी तयार करण्यात आले आहे. नायगाव पूर्वेला लोकसंख्या वाढत असून, या लोकसंख्येला वाळीव पोलिस ठाणे पुरे पडत नसल्याने नव्याने नायगाव पोलिस ठाणे तयार करण्यात आले आहे.