मैदानाच्या कट्ट्यावर फेरीवाल्यांचे बस्तान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानाच्या कट्ट्यावर फेरीवाल्यांचे बस्तान
मैदानाच्या कट्ट्यावर फेरीवाल्यांचे बस्तान

मैदानाच्या कट्ट्यावर फेरीवाल्यांचे बस्तान

sakal_logo
By

घणसोली, ता. ८ (बातमीदार)ः घणसोली सेक्टर ९ मधील एसपी शाळेच्या समोरील मोकळ्या मैदानावर सिडकोने कुंपण घातले आहे, परंतु मैदानाच्या प्रवेशाच्या समोरील बाजूस कुंपण नसल्याने लहान-मोठे व्यापारी कठड्यावर व्यवसाय मांडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या महिला तसेच ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा नसल्याने नाराजीचा सूर आहे.
घणसोली विभाग दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी सेक्टर ९ परिसरात महापालिकेचे मोकळे मैदान असून मैदानाच्या समोरील बाजूस कुंपण नसल्याने नागरिक या कट्ट्यावर बसतात. तसेच परिसरात हनुमान मंदिर आणि शाळा असल्याने अनेकदा पालकांनादेखील थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी या कठड्यांचा आधार मिळतो; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काही फेरीवाल्यांनी येथे व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे या ठिकाणाला बकाल स्वरूप आले आहे. तसेच कट्ट्यावर थाटलेल्या व्यवसायांमुळे पदपथांवरदेखील कोंडी होत आहे. त्यामुळे कोणतीही परवानगी नसताना या ठिकाणी बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर सिडकोने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------------------
एसीपी शाळेच्या समोर असलेल्या मैदानाच्या कट्ट्यावर सायंकाळी विरंगुळा म्हणून नागरिक बसतात, पण सध्या येथे काही बेकायदा व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
- चंदन चव्हाण, महिला