मुलुंडमध्ये ‘होळी हुडदंग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये ‘होळी हुडदंग’
मुलुंडमध्ये ‘होळी हुडदंग’

मुलुंडमध्ये ‘होळी हुडदंग’

sakal_logo
By

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मुलुंडमधील हरजू गर्जू संघ आणि युवा ब्रिगेड असोसिएशनच्या वतीने ‘होळी हुडदंग’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक डॉ. बाबूलाल सिंग यांनी एम. जी. रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. सचिन सिंग यांनी सांगितले, की या होळी हुडदंग उत्सवात आझमगडचे प्रसिद्ध लोकगायक चंद्रशेखर पटेल, नरेंद्र भारती, जेपी मौर्य, प्रियांका भारती आदींनी आपल्या फागुआ कबीर लोकगीतांमधून सर्वांचे मनोरंजन केले. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस सुनील गंगवानी, वरिष्ठ काँग्रेस नेते डॉ. आर. आर. सिंग, ईशान्य मुंबई कार्याध्यक्ष उत्तम गीते यांच्या प्रमुख उपस्थितीसह काँग्रेसचे पदाधिकारी कैलाश पाटील, उत्तर भारतीय मित्रमंडळाचे अध्यक्ष के. एन. सिंग, ॲड. अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत सहसंयोजक डॉ. आर. एम. पाल, सुरेंद्र मिश्रा, मोहित सिंग यांनी केले.

बी. जी. खेर यांचा स्मृतिदिन
धारावी, ता. ८ (बातमीदार) : मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री व थोर समाजसेवक बाळ गंगाधर खेर ऊर्फ बी. जी. खेर यांचा ६६ वा स्मृतिदिन आज (ता. ८) सकाळी साडेसात वाजता वांद्रे पूर्व, कलानगर येथील नंदादीप उद्यान या ठिकाणी मॉर्निंग वॉकर्स ग्रुपतर्फे साजरा करण्यात आला. सकाळी वॉक करायला येणाऱ्या लोकांनी पुढाकार घेऊन ज्‍येष्ठ महिला श्रद्धा बांगम यांच्‍यासह सर्वांनी त्याच उद्यानातील फुले जमा करून खेर यांच्या प्रतिमेच्या चरणी ती फुले अर्पण करून आदरांजली वाहिली. याकरिता धारावीतील समाजसेवक व मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे दिलीप गाडेकर, गुरुनाथ वैती, सी. उमाकांत, प्रकाश चंद्रन, सुनीता पाटील यांनी पुढाकार घेतला होता. या वेळी खेर यांच्या कार्याची माहिती देऊन नवीन पिढीला त्यांची आठवण करून देण्यात आली. याप्रसंगी राजस्थानी खाटीक संघ व खेरवाडी सोशल वर्कर असोशियन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.