Wed, June 7, 2023

वसईच्या किल्ल्यात फुलतोय भंडीरा
वसईच्या किल्ल्यात फुलतोय भंडीरा
Published on : 8 March 2023, 10:09 am
विरार, ता. ८ (बातमीदार) : मराठ्यांच्या इतिहासात वसई किल्ल्याला मोठे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर प्रथमच एका परकीय शत्रूचा (पोर्तुगिजांचा) मराठ्यांनी या ठिकाणी पराभव केला. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासातील वसईची लढाई हे एक सोनेरी पान आहे. या किल्ल्यात सध्या वेडिंग फोटोग्राफी, मद्यपींचा गराडा असला तरी या किल्ल्यातच सध्या भंडीरा मोठ्या प्रमाणात फुलत आहे. या फुलाचे शास्त्रीय नाव क्लोरोडेंड्रम इन्फॉर्च्युनेटम असे आहे, असे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. स्वप्ना प्रभू यांनी सांगितले.