मर्चंट पतसंस्थेत सहकार पॅनेलचा झेंडा

मर्चंट पतसंस्थेत सहकार पॅनेलचा झेंडा

जव्हार, ता. ८ (बातमीदार) : तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. ५) मतदान झाले. सलग २२ वर्षे बिनविरोध निवडून येणाऱ्या पतसंस्थेची यंदा पाहिली निवडणूक होती. यात मर्चंट सहकार पॅनेलचे सर्वच उमेदवार एकहाती निवडून येऊन घवघवीत यश प्राप्त करत आपली २२ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. जव्हारमधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बँकेचे एकूण २ हजार १५४ सभासद आहेत. ही निवडणूक ज्ञानगंगा हायस्कूलच्या आवारात पाड पडली. निवडणुकीसाठी चार बूथचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण एक हजार ५१० मतदारांनी मतदान केले असून ७० टक्के मतदान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com