Wed, June 7, 2023

अर्नाळ्यात पौष्टिक तृणधान्य शिबिर उत्साहात
अर्नाळ्यात पौष्टिक तृणधान्य शिबिर उत्साहात
Published on : 8 March 2023, 10:23 am
वसई, ता. ८ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य तसेच सहकार, पणन व विविध कृषीविषयक योजनांची माहिती कार्यक्रम अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी अर्नाळा, आगाशी, टेंभी-कोल्हापूर, परिसरातील शेतकरी व वर्तक महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी तसेच अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.चे सदस्य उपस्थित होते. शिबिराला तालुका कृषी अधिकारी बी. टी. एम. देशमुख, कृषी सहायक एस. एस. चव्हाण उपस्थित होते. या वेळी पौष्टिक तृणधान्य महत्त्व या विषयावर वर्तक महाविद्यालयातील प्राध्यापकांनी महत्त्व विशद करून उपस्थितांमध्ये जनजागृती केली.