Sat, June 3, 2023

भिवंडीत होळी, धुळवड आनंदात साजरी
भिवंडीत होळी, धुळवड आनंदात साजरी
Published on : 8 March 2023, 10:45 am
भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात होळी व धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात लहान मुलांसह नागरिकांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरा केला; तर सोमवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्री होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये ‘एक गाव एक होळी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होळीनिमित्त वडघर ग्रामपंचायतीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.