सेंट जोसेफ महाविद्यालयात महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जोसेफ महाविद्यालयात महिला दिन
सेंट जोसेफ महाविद्यालयात महिला दिन

सेंट जोसेफ महाविद्यालयात महिला दिन

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ (बातमीदार) ः ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अत्यंत उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सांस्कृतिक आणि मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्चीसारखे विविध खेळ घेण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा यांनी बासरीवादन करून कार्यक्रमात रंगत आणली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे यांनी स्त्रियांच्या योगदानाबद्दल गौरवोद्‍गार काढले आणि आपले ज्ञानदीप मंडळ स्त्रियांचा नेहमीच सन्मान करते याविषयी अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश संसारे यांनी केले; तर डॉ. कविता आल्मेडा यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले.