Sun, May 28, 2023

परीक्षा केंद्रावर शिक्षिकांना शुभेच्छा
परीक्षा केंद्रावर शिक्षिकांना शुभेच्छा
Published on : 8 March 2023, 10:21 am
वाडा, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात दहावी परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून आलेल्या सर्व महिलांना पेपर सुरू होण्यापूर्वी कुडूस विभाग शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकांत भोईर यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. तसेच त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे सदस्य जे. एस. पाटील आणि मुख्याध्यापक संदेश पाटील उपस्थित होते.