महामार्गावरील सेवा रस्त्याची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील सेवा रस्त्याची रखडपट्टी
महामार्गावरील सेवा रस्त्याची रखडपट्टी

महामार्गावरील सेवा रस्त्याची रखडपट्टी

sakal_logo
By

कासा, ता. ८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाण पूल येथून महालक्ष्मीच्या दिशेने रखडलेला सेवा रस्ता तयार करण्याचे काम सुरू करावे, तसेच एसियन पंपाजवळ अंडरपास करावा, अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. चारोटी ते अल्फा हॉटेलपर्यंत दुतर्फा सेवा रस्ता करण्यात आला असून तो महालक्ष्मीपर्यंत पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे सहा ते सात वर्षांपूर्वी उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. आयआरबी ठेकेदाराने चारोटी ते महालक्ष्मीपर्यंत सेवा रस्ता तयार करायचा होता; मात्र सेवा रस्ता अपूर्ण असल्याने वाहने विरुद्ध दिशेने धावून अनेक अपघाताच्या घटनात स्थानिकांचे मोठे बळी गेले. यामुळे स्थानिकांनी तसेच चारोटी ग्रामपंचायतीने ही सातत्याने सेवा रस्त्यासाठी पाठपुरावा केला. मुंबई वाहिनीवरून बसवत पाडा येथे जाण्यासाठी हा महामार्ग ओलांडावा लागतो. त्यात अनेक वाहने एसियन पंपावर पेट्रोल, डिझेल व सीएनजी गॅस भरण्यासाठी हा महामार्ग ओलांडतात यात शेकडो वाहनाचे अपघात झाले आहेत. अनेक शेतकरी शेती कामासाठी हा रस्ता धोकादायक स्थितीत ओलांडतात. त्यासाठी येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाण पूल बांधण्याची मागणी बसवतपाडा ग्रामस्थांनी, तसेच चारोटी ग्रामपंचायतीतर्फे केली आहे.

---------------
महामार्ग प्रशासनाने अपूर्ण सेवा रस्त्याचे काम सुरू केले आहे. मध्यंतरी काही दिवस काम बंद होते. होळीनिमित्त कामगार बाहेर गावी गेल्याने कामास उशीर झाला आहे. दोन दिवसांत पुन्हा काम सुरू करण्यात येईल.
- मुकुंद अत्तरदे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण