होळीप्रसंगी भांडणात एकाचा मृत्यू

होळीप्रसंगी भांडणात एकाचा मृत्यू

कासा, ता. ८ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील निकावली येथे दारू पिऊन होळी साजरी करणाऱ्या मजुरांपैकी एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केल्याने त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे.
सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या मागे स्मशानभूमीजवळील शेडजवळ मजुरांनी होळी साजरी केली. या वेळी अभिजीत मोरे (वय २२) याने शिवराज खरतडे (वय २२) यास चाकूने पोटात, दंडावर, गळ्यावर वार करून जखमी केले व तो फरारी झाला. गंभीर जखमी शिवराज यास कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; पण जखम गंभीर असल्याने त्याला ताबडतोब शेलवास येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. त्याचा बुधवारी (ता. ८) सकाळी मृत्यू झाला. याबाबतीत कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरारी आरोपी अभिजीत यास अटक केली आहे. विहिरीच्या कामासाठी सातारा जिल्ह्यातून मजूर आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com