महिला दिन उत्‍साहात

महिला दिन उत्‍साहात

मुंबई, ता. ८ ः जागतिक महिला दिनाच्‍या निमित्ताने मुंबईसह उपनगरांमध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध ठिकाणी महिला शक्‍तीचा सन्‍मान करण्यात आला. यामध्‍ये शिक्षिका, वकील, कर्मचारी, अधिकारी अशा विविध क्षेत्रांतील महिलांचा समावेश होता.

शिक्षक परिषदेकडून मुख्‍याध्‍यापिकांचा सन्‍मान
मुंबई (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कर्तृत्ववान मुख्याध्यापिकांचा २५ शाळांमध्ये जाऊन सत्कार केला. दहावीची परीक्षा सुरू असल्यामुळे एका ठिकाणी सर्वांना बोलावून कार्यक्रमाचे आयोजन न करता, परीक्षेचा वेळ व कालचा सण हा सर्व ताणतणाव विचारात घेऊन प्रत्‍येक शाळांमध्ये अर्ध्या तासाचा कार्यक्रम करण्यात आला.
महिला दिनाची सुरुवात कशी झाली, महिलांचे हक्क, सक्षमीकरण, बालसंगोपन रजा यावर अनेक ठिकाणी चर्चा-परिसंवाद झाला, केंद्र सरकारप्रमाणे दोन वर्षांची बालसंगोपन रजा मिळावी तसेच महिला दिनी शासनाकडून कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, महिलांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात यावे, अशा मागण्या या वेळी झालेल्या चर्चासत्रात करण्यात आल्‍या.
हजारहून अधिक शिक्षकांनी कार्यक्रमात भाग घेतला. ४० हून अधिक विज्ञान परिषद पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षिकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

अरुणोदय वॉकर्सतर्फे एमआयजीमध्ये महिला दिन
धारावी (बातमीदार) : अरुणोदय वॉकर यांच्या वतीने वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लब मैदान येथे औपचारिक महिला दिन पार पडला. या वेळी समाजसेविका शामल पारेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व अंजली रिसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांनी एकत्रित येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी गुलाबाचे फुल व मिठाई वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांना महिला दिनाचे महत्त्व सांगितले गेले. या वेळी शिल्पा शिरोळे, भारती शहा, शैलीजा सोमानी, वसुंधरा देशपांडे, भारती पोळ, नीलिमा भावे इत्यादी महिला भगिनींनी पुढाकार घेऊन सर्व महिलांचे स्वागत करून भेटवस्तू दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com