Wed, June 7, 2023

पाककला स्पर्धेला महिलांचा प्रतिसाद
पाककला स्पर्धेला महिलांचा प्रतिसाद
Published on : 8 March 2023, 12:19 pm
ठाणे, ता. ८ ः ठाणे शहरातील डीडीएम शाळेत महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा पालकांसाठी त्यांचे स्वयंपाक कौशल्य दाखवण्यासाठी आणि एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ होते. शेफ आशीष पाटील, पुण्यात कुकिंग क्लास चालवणाऱ्या प्रगती काळोखे आदी या वेळी उपस्थित होत्या. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी नावीन्यपूर्ण आणि स्वादिष्ट पदार्थांचे सादरीकरण केले. पारंपरिक भारतीय पाककृतींपासून ते फ्यूजन डिशेसपर्यंतच्या पदार्थांचा यामध्ये सहभाग होता. परीक्षकांनी पदार्थांची चव, सादरीकरण आणि घटकांचा वापर यावर आधारित मूल्यमापन केले.