ठाण्यातील महिलांना ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील महिलांना ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार
ठाण्यातील महिलांना ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार

ठाण्यातील महिलांना ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहर महिला मोर्चातर्फे ९ ते १४ मार्च या कालावधीत महिला सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या वेळी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या ठाण्यातील महिलांचा ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिली. ‘भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज या उत्तम वक्त्या होत्या. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने हा सन्मान देऊन महिलांना प्रोत्साहित केले जाणार आहे. कर्तृत्ववान महिलांना चांगले काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. ठाण्याच्या विविध भागांमध्ये हा कार्यक्रम होणार असून २०० महिलांचा सन्मान होणार आहे,’ असे महिला मोर्चाच्या ठाणे अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी सांगितले.