
७० महिलांचे रक्तदान
केईएम रुग्णालयात
महिलांचे रक्तदान शिबिर
मुंबई, ता. ८ : जीवनदाता सामाजिक संस्थेच्या महिला टीमकडून केईएम रुग्णालयात आज महिलांसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त ‘घे भरारी रक्तदानासाठी’ थीमवर आधारित सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. रक्तदान शिबिराचे नेतृत्व केवळ महिलांनीच केले. महिला विशेष रक्तदान शिबिराचे उद्घाटन शेतीपूरक ॲग्रिटेक (वावर)चे डायरेक्टर शरावती संजय शिरोडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. रजनी ग्वालानी, समाजसेविका रूपा शेट्टी (लायन ऑफ टिटवाळा) व इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या. शिबिरात ३२७ महिलांनी उपस्थिती दर्शवली. त्यातील ७० महिलांनी रक्तदान केले. इतर महिला हिमोग्लोबिन व इतर समस्यांमुळे रक्तदान करू शकल्या नाहीत. महिलांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून एका वेगळ्याच आनंदाला गवसणी घातली. १०० मधील ५० महिला केवळ हिमोग्लोबिन कमतरतेमुळे रक्त देऊ शकल्या नाहीत. विशेष सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ५० वर्षांवरील १६ महिलांनी रक्तदान केले. त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.