Thur, June 1, 2023

नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघे बचावले
नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघे बचावले
Published on : 8 March 2023, 2:29 am
मुंबई, ता. ८ : भारतीय नौदलाचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर नियमित उड्डाण करीत असताना कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे कारण अस्पष्ट असून, भारतीय नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. नौदलाच्या या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. बुधवारी सकाळी उड्डाण केल्यानंतर अचानक ते कोसळले. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचावकार्य सुरू केले. नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.