Fri, June 2, 2023

कर्करोगाला कंटाळून दादरमध्ये वृद्धेची आत्महत्या
कर्करोगाला कंटाळून दादरमध्ये वृद्धेची आत्महत्या
Published on : 8 March 2023, 2:12 am
मुंबई, ता. ८ : कर्करोगाच्या त्रासाला कंटाळून एका ६४ वर्षीय महिलेने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दादर पश्चिम येथे घडली. रोहिणी पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्या कर्करोगामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. याबाबत दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. आतापर्यंत निरोगी जगल्यानंतर वयाच्या ६४ व्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती.
रोहिणी पाटील या दादर पश्चिम येथील साईकृपा इमारतीत कुटुंबासमवेत वास्तव्यास होत्या. इमारतीच्या गच्चीवर त्या दररोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी सकाळी गच्चीवर गेल्या; मात्र काही वेळाने इमारतीखाली त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.