Mon, May 29, 2023

वांद्री धरणात बुडून मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू
वांद्री धरणात बुडून मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू
Published on : 8 March 2023, 4:41 am
मनोर, ता. ८ ः गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. होळीच्या निमित्ताने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोघेही धरण परिसरात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. धरणाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. स्वप्नील विजय मस्के (वय २७) आणि अजय पांडुरंग साळवे (वय २६) अशी या तरुणांची नावे असून दोघेही मुंबईच्या मालाड-कांदिवली परिसरातील रहिवासी होते. मनोर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.