बचत गटांच्या माध्यमातून वस्तूंची प्रदर्शने

बचत गटांच्या माध्यमातून वस्तूंची प्रदर्शने

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून महिला मेळावा आणि बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ पश्चिम भागातील मोरिवली शाळेमध्ये झालेल्या महिला मेळाव्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. शहरातील विविध बचत गटांना नगरपरिषदेमार्फत करण्यात येणारी कामे मिळण्याकरिता प्राधान्य द्यावे तसेच त्यांच्या सक्षमीकरणाकरितादेखील पुढाकार घ्यावा, अशा सूचना आमदार डॉ. किणीकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक साह्य मिळून त्यांच्या उन्नतीकरणास बळ मिळेल अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या. या वेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, चंद्रकांत भोईर, महिला आघाडीच्या सुवर्णा साळुंके, तसेच पदाधिकारी, महिला बचत गट व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com