कलिंगडला बाजारात कवडीचे मोल

कलिंगडला बाजारात कवडीचे मोल

वाशी, ता. ९ (बातमीदार) ः उन्हाळा सुरू झाल्याने बाजारात गारवा देणारी कलिंगडेही मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात कलिंगडची आवक वाढली असून दररोज ४० ते ४५ गाड्या येत असल्याने घाऊक बाजारात ८ ते १० रुपये किलोने कलिंगड विकले जात आहेत.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात कलिंगडाला मागणी वाढते. त्यानुसार बाजारात सध्या कलिंगडाची आवक १० ते १५ गाड्यांवरून ४० ते ४५ गाड्यांवर आली आहे. सांगली, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट येथून मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये होत आहे. यात गडद हिरव्या रंगाच्या ‘शुगर किंग’नावाने ओळखल्या जाणाऱ्या कलिंगडाला अधिक मागणी आहे. नावाप्रमाणेच या कलिंगडाची चवही साखरेसारखी असते. फिक्कट हिरवे पट्टे असणारी लांबट आणि आकाराने मोठी असणारी ‘नामधारी’ ही प्रजातीदेखील बाजारात आली आहे. फ्रूट सलाड तसेच ज्यूस बनवण्यासाठी या कलिंगडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
----------------------------------------------
सध्या आवक मोठ्या प्रमाणात असल्याने घाऊक बाजारात सध्या शुगर किंग जातीचे कलिंगड सहा ते आठ; तर नामधारी आठ ते १० रुपये किलोने विकले जात आहेत; तर किरकोळ बाजारात हे कलिंगड पंधरा ते अठरा रुपये किलोने विकले जात आहेत.
- भरत मोरे, व्यापारी, एपीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com