Tue, May 30, 2023

पालिका कर्मचारी वर्गाचा स्नेहमेळावा
पालिका कर्मचारी वर्गाचा स्नेहमेळावा
Published on : 9 March 2023, 10:30 am
मुलुंड, ता. ९ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेतील समन्वयक कर्मचारी वर्गाचा स्नेहमेळावा नुकताच झाला. सहाव्या वेतन आयोगानुसार देय असलेला ‘ग्रेड पे’ लढा यशस्वी झाल्याने ३०० समन्वयक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली असून गेल्या सहा वर्षांची पगारवाढीच्या फरकाची रक्कमदेखील मिळाली आहे. या अनुषंगाने म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ या वेळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, चिटणीस संजय वाघ, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, सल्लगार हरीश जामठे आदी मान्यवरांचा सत्कार या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला युनिटप्रमुख श्रीपाद नाईक उपस्थित होते.