गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात महिलांचा सन्मान
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात महिलांचा सन्मान

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात महिलांचा सन्मान

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ९ (बातमीदार) ः महिला दिनानिमित्त बुधवारी (ता. ८) गोवंडीच्या पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय म्हणजेच शताब्दी रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांचा तसेच डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पाकळे व समाजविकास अधिकारी छाया चोरमोले यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. गोवंडी-चेंबूर परिसरातील महिला रिक्षाचालकांसह विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. माता रमाई, सावित्रीबाई फुले तसेच अहिल्याबाई होळकर या थोर महिलांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उपस्थित महिलांना तुळशीचे रोप व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.