Tue, June 6, 2023

आमदार राजू पाटील यांच्याकडून संगणक भेट
आमदार राजू पाटील यांच्याकडून संगणक भेट
Published on : 9 March 2023, 10:19 am
डोंबिवली, ता. ९ : महिला दिनाचे औचित्य साधून मनसे आमदार राजू पाटील यांनी एसएनडीटीशी संलग्न असलेल्या स. वा. जोशी महिला महाविद्यालयाला मोफत तीन संगणक भेट दिले. या संगणकांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वकील तृप्ती पाटील, मनसे महिला पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महाविद्यालयास संगणक भेट दिल्याबद्दल महाविद्यालयातर्फे आमदार राजू पाटील यांचे आभार मानण्यात आले.