कुर्ला पोलिस ठाण्यातर्फे विशेष कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ला पोलिस ठाण्यातर्फे विशेष कार्यक्रम
कुर्ला पोलिस ठाण्यातर्फे विशेष कार्यक्रम

कुर्ला पोलिस ठाण्यातर्फे विशेष कार्यक्रम

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ९ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनानिमित्त कुर्ला पोलिस ठाण्याच्या आवारात बुधवारी (ता. ८) सायंकाळी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र होवाळे यांच्या पुढाकाराने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भायखळा येथील साबू सिद्दिकी तंत्र महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. झेबा मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी वरिष्ठ निरीक्षक होवाळे यांनी आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्रियांचे आरोग्य, शिक्षण या विषयी डॉ. झेबा यांनी या वेळी मार्गदर्शन केले. महिलांना गुलाबाचे फूल व अल्पोपाहाराचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.