Thur, June 1, 2023

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना मदत
अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना मदत
Published on : 9 March 2023, 11:48 am
मुंबई, ता. ९ : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचारांच्या खर्चापोटी तीन लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. सुलोचना लाटकर यांना श्वसनाशी संबंधित संसर्ग झाला असून, त्या दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या परिवाराकडे चौकशी केली, तसेच तातडीने उपचारांसाठीचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याच्या सूचना दिल्या.