Wed, May 31, 2023

महिला सफाई कर्मचाऱ्यांची कर्करोग तपासणी
महिला सफाई कर्मचाऱ्यांची कर्करोग तपासणी
Published on : 9 March 2023, 9:51 am
ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे ही संकल्पना राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने महिला दिनानिमित्त सफाई कर्मचारी महिलांची मॅमोग्राफी व्हॅनद्वारे कर्करोगाची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी आरोग्य केंद्रात मॅमोग्राफी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली होती. ५० पेक्षा अधिक सफाई महिला कर्मचाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला.