Sun, May 28, 2023

डोंबिवली ग्रंथालयाचा उद्या वर्धापनदिन
डोंबिवली ग्रंथालयाचा उद्या वर्धापनदिन
Published on : 9 March 2023, 10:40 am
डोंबिवली, ता. ९ (बातमीदार) : डोंबिवली ग्रंथालयाचा ३४ वा वर्धापनदिन शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ‘महाराष्ट्रीय भारतरत्न’ हा अभिवाचनाचा दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय म्हणून ज्यांना भारतरत्न मिळाला अशा व्यक्तींचा कर्तृत्वपट या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. अमेय रानडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यांच्यासोबत तपस्या नेवे आणि आकाश भडसावळे सहकलाकार म्हणून काम करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.