२५ हजार महिलांचा बसमधून प्रवास

२५ हजार महिलांचा बसमधून प्रवास

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त मिरा-भाईंदर महापालिकेने महिलांना संपूर्ण दिवस बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली होती. या संधीचा फायदा घेऊन तब्बल २५,८४० महिला प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. गेल्या दोन वर्षांतील महिला प्रवाशांची ही सर्वात जास्त संख्या आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ८ मार्चला महिलांच्या सन्मानार्थ मिरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा देत आहे. या वर्षीदेखील ही सुविधा देण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले होते. २०२१ मध्ये ११,५५२ महिलांनी व २०२२ मध्ये २१,४६३ महिलांनी बसमधून मोफत प्रवास केला होता. त्या तुलनेत यंदा २५,८४० महिला प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतल्यामुळे मिरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेचा अधिकाधिक महिला लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी परिवहन उपक्रमात ५७ इलेक्ट्रिक बस समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com