कल्याण पश्चिमधील उड्डाण पुलाचे काम थांबवा

कल्याण पश्चिमधील उड्डाण पुलाचे काम थांबवा

कल्याण, ता. ९ (बातमीदार) : कल्याण पश्चिममध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होणार आहे. त्या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन केडीएमसीचे तात्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता न करता तेथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. १४ एप्रिलपूर्वी काम थांबवावे अथवा उग्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीने दिला आहे.
कल्याण पश्चिमेला छाया टॉकीजसमोर मुरबाड रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. हे उद्यान मागासवर्गीयांसहित सर्व कल्याणकरांचे आदराचे ठिकाण असून १४ एप्रिल, ६ डिसेंबर रोजी तेथे आंबेडकरी अनुयायी आणि सर्वच समाजातील नागरिक येत असतात. कल्याण-मुरबाड रस्तारुंदीकरण करताना दोन वेळा उद्यान बाधित झाले होते. सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत त्या परिसरामधून उड्डाण पूल होणार असून तिसऱ्यांदा आंबेडकर उद्यान बाधित होणार आहे. उद्यान वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीने २० नोव्हेंबर २०२२ रोजी उपोषण केले होते. त्याची दखल घेत केडीएमसी तात्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्यांना उद्यानाची जागा वाढवून देऊ, उद्यान सुशोभीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने त्या वेळी आंदोलन मागे घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com