हत्याकांडातील दोघा आरोपींना कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्याकांडातील दोघा आरोपींना कारावास
हत्याकांडातील दोघा आरोपींना कारावास

हत्याकांडातील दोघा आरोपींना कारावास

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.९ (वार्ताहर) : सीबीडी रेल्वेस्थानकातील शौचालयात काम करणाऱ्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे सीबीडी रेल्वेस्थानकालगतच्या कचराकुंडीत टाकणाऱ्या दोघा आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे; तर तिसऱ्या आरोपीला पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. जुलै २०१५ मध्ये सीबीडी रेल्वेस्थानकातील शौचालयात ही घटना घडली होती.
सीबीडी रेल्वेस्थानक आवारातील शौचालयाच्या साफसफाईचे काम करणाऱ्या कार्तिककुमार जयस्वाल याला नोकरीवरून काढून सत्यनारायण यादव, मनोजकुमार यादव आणि कमलेश बन्सल या तिघांनी कामावर ठेवले होते. याचा राग मनात धरून दारूच्या आहारी गेलेल्या कार्तिककुमार जयस्वाल हा तिघांना शिवीगाळ, तसेच जबरदस्तीने पैसे काढून घेत होता. कार्तिककुमारचा त्रास वाढत असल्याने ४ जुलै २०१५ रोजी सत्यनारायण आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी कार्तिकची गळा आवळून हत्या केली होती. तसेच ६ जुलै रोजी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून सीबीडी रेल्वेस्थानकालगतच्या कचराकुंडीत टाकून दिले होते. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
--------------------------------------------