कर्करोगासंबंधी पालिकेचे जागरूकता शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगासंबंधी पालिकेचे जागरूकता शिबिर
कर्करोगासंबंधी पालिकेचे जागरूकता शिबिर

कर्करोगासंबंधी पालिकेचे जागरूकता शिबिर

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः महापालिकेच्या एन वॉर्डच्‍या वतीने महिलांसाठी आरोग्याचा कानमंत्र या उपक्रमांतर्गत कर्करोगासंबंधी जागरुकता शिबिरचे आयोजन केले होते. या शिबिरात पालिकेतील कर्मचारी वर्ग, अधिकारी आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या. पालिका एन वॉर्डचे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी कार्यकारी अभियंता मारुती पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, भाभा रुग्णालयाच्या डॉ. विजया बाबरे आदी उपस्थित होते. भाभा रुग्णालयाच्या डॉ. विजया बाबरे यांनी कर्करोग या आजारासंबंधी महिलांना मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा देत आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली निकुंब यांनी केले.