लालबागमध्ये गणेशगल्ली खाद्यमहोत्सव

लालबागमध्ये गणेशगल्ली खाद्यमहोत्सव

शिवडी, ता. ९ (बातमीदार) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही बाळ गोपाळ मंडळ (पूर्व विभाग) यांच्या वतीने १५ ते १९ मार्चदरम्यान ‘गणेशगल्ली खाद्यमहोत्सव’चे करण्यात आले आहे. हा खाद्यमहोत्सव सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत भरणार असून महाराष्ट्राच्या विविध खाद्य पदार्थांची मेजवानी खवय्यांना चाखायला मिळेल. तसचे या महोत्सवात अनेक लघुउद्योगांनादेखील प्रधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर घरगुती महिला बचत गटांच्या विविध वस्तूदेखील या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत; तर लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व बाल नगरीदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १५) सायंकाळी ७ वाजता या खाद्यमहोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव आशिष लोकरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com