यिनतर्फे यिन संवाद कार्यक्रमाचे ठाण्यात आयोजन

यिनतर्फे यिन संवाद कार्यक्रमाचे ठाण्यात आयोजन

ठाणे, ता. ९ : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिन व्यासपीठातर्फे राष्ट्र परिवर्तन प्रकल्प, सामाजिक उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम आणि समाजसेवा आदी विषयांवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पाडले जातात. अशा कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त सहभाग असतो. अशाच यिन संवाद कार्यक्रमाचे आयोजन येत्या शनिवारी (ता. ११) सकाळी ठीक १० वाजता के. बी. पी. महाविद्यालय, ठाणे येथील हॉलमध्ये करण्यात आले आहे. यिन संवाद कार्यक्रमात आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि अभिनेते संतोष व्हडगीर आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. के. बी. पी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत नेतृत्व विकास, आतापर्यंतचा मान्यवरांचा थक्क करणारा प्रवास आदी विषयांवर मार्गदर्शन आणि संवाद साधण्यात येणार आहे. तसेच के. बी. पी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील यिनचे उमेदवार आणि यिन क्लबचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com