Tue, June 6, 2023

ट्रेलरच्या धडकेत मुलीचा मृत्यू
ट्रेलरच्या धडकेत मुलीचा मृत्यू
Published on : 9 March 2023, 12:22 pm
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : एक तरुण दोन लहान मुलींना स्कूटीवरून घेऊन जात असताना भरधाव ट्रेलरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कूटीवरील आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी व चालक तरुण जखमी झाले आहेच. ही घटना मंगळवारी सकाळी उरणजवळील पंजाब द्रोणागिरी चौकात घडली. या अपघातानंतर ट्रेलरचालक पळून गेला असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील मृत मुलीचे नाव सायली किशोर भोईर असे असून जखमींमध्ये सृष्टी सदानंद पाटील (वय १२) व कुंदन कल्पनाथ सरोज (वय २५) या दोघांचा समावेश आहे.