पाणी-रस्त्यासाठी आदिवासींचा मोर्चा

पाणी-रस्त्यासाठी आदिवासींचा मोर्चा

पेण, ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील आयएसओ प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडाच्या क्षेत्रातील वडमालवाडी आदिवासी वाडीसाठी जलजीवन मिशनमधून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात यावी, आदिवासी वाडीचा रस्ता विनाविलंब बनविण्यात यावा, या मागण्यांसाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने आज सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शेकडो आदिवासी बांधवांनी पेण पंचायत समितीवर धडक दिली.
या वेळी संतप्त मोर्चेकऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अडवल्यानंतर तिथे मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर करण्यात आले. आदिवासी समाजाच्या समस्या अनेक वर्षे सुटत नसल्याने समाजाला आंदोलन करावे लागत आहे. प्रशासन आश्वासन देऊनही पाळत नाही. त्यामुळे आंदोलन केले असून जर येत्या २१ मार्चपूर्वी समस्या सुटल्या नाहीत तर या नंतरचे आमरण उपोषणाचे आंदोलन रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले. या वेळी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी सांगितले की, रस्ता आणि पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोर्चा काढावा लागतो, याबाबत खेद वाटत असून याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणार आहे.
...
... यांची उपस्थिती
मोर्चावेळी महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे, ॲड. विकास शिंदे, ॲड. अक्षय, स्मिता रसाळ, सचिन पाटील, गुरुदास वाघे, सुनील वाघमारे, अनिता वाघे, नर्मदा वाघे, रंजना वाघे, पुष्पा वाघे, चंद्रभागा पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com